‘रंग दे बसंती’ एक मदतीचा हात….

खोल दे पंख मेरे ,
कहता है परिंदा,
जमी नही है मंजील मेरी,
अभी पुरा आस्मान बाकी है “
या ओळी ज्यांना चपखलपणे लागू होतात असा ‘क्रेझी फ्रेड्स ग्रुप’
समाजासाठी सहजपणे शक्य असेल तर काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी काम सुरू केलं. कुठं साफसफाई, कुठं एखादा लहानसा सांस्कृतिक कार्यक्रम घे. त्यासाठी फक्त गल्लीतली चिमुकली मुलं आली तरी चालतील. कुणी मोठ्यानं यावं, खूप मोठी दाद मिळावी असं कसलिही अपेक्षा नव्हती. अन् बघता-बघता तीसेक मित्रांचा गोतावळा जमला. काही मुलं, काही मुली. काही वर्गमित्र. काही वर्गमित्रांचे मित्र. असे एकाच धाग्यातले मणी एक-एक करत गुंफत गेले आणि छोटं-छोटं कामही वाढत गेलं. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी अधिकृतपणे क्रेझी फ्रेंडस् या ग्रुपची स्थापना झाली. या ग्रुपचं काम किती तरी दिवस आधीपासून सुरू होतं. त्यावर फक्त नावाची मोहोर लागली.

ग्रुप स्थापन झाल्यापासून छोट्या-छोट्या कामांची मालिका अविरतपणे सुरू आहे. ग्रुपमधील सदस्यांचं आजही कॉलेज सुरूय. कोणी इंजिनीअरिंग, कोणी एम.ए, कोणी मास कम्युनिकेशन, तर कोणी आणखी काही. जमेल तसा पैसा जमा करतात. इतकाच जमा करावा असा अट्ट्हास नाही. जितकं करायचं तितकंच, पण मनापासून ही भावना मागे दडलीय. दरवर्षी २५ डिसेंबर ते १ जानेवारीच्या काळात ‘स्प्रेड हॅप्पीनेस वीक’ साजरा केला जातो. या आठवड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मदर तेरेसा अनाथाश्रमात फळवाटप, रक्तदान शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिबिराचं आयोजन.  या युवकांना रचनात्मक काम करायला नेहमीच आवडतं. महापालिकेच्या काही शाळा या ग्रुपनं निवडल्या. त्या शाळेत महिला, विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं. शहरात इतर अनेक ग्रुप समाजसेवेची छोटी-मोठी काम करतात. त्यांच्या सोबतीनं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदान जनजागृतीच्या कामाला सुरुवात केली. ग्रुपच्या वर्धापनदिनी सावकर चौक, टिळकनगर भागात स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. दिवाळी आली की दरवर्षी शहरात उत्साहाचा माहोल असतो. फटाक्यांची आतषबाजी होते. दिवाळीनंतरही ही आतषबाजी अनेकदा सुरू असते. यामुळे प्रचंड प्रदूषण होतं. मराठवाडा दुष्काळाच्या खाईत आहे. याला हे प्रदूषणही जबाबदार आहे. याच भान ठेवत तीन वर्षांपासून ग्रुपमधील सदस्यांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करायचा निश्चय केलाय आणि तो अंमलातही आणला. दरवर्षी टिळकनगरातील व्यंकटरमण बालाजी मंदिरात दीपोत्सव साजरा करत ग्रुपच्या वतीनं दिवाळी साजरी केली जाते. दोन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू झाला. या वर्षी परिसरातील नागरिकच दीपोत्सवासाठी उत्साही होते. यंदाचा दीपोत्सव कधी, अशी विचारणा व्हायची आणि तो दणक्यात, जोशात, उत्साहात साजराही झाला. एक दीप पेटलाय प्रदूषण विरहित दिवाळीचा. तो फक्त इथून पुढे कायम तेवत ठेवायचा आहे. 

उन्हाळ्यात  बच्चे कंपनीसाठी उन्हाळी शिबिराचं आयोजन केलं जातं. या शिबिरात ओंकार, श्लोक, अॅबॅकस, चित्रकला, खेळ आदी कलागुणांनी लहानग्यांना समृद्ध करायचा प्रयत्न केला जातो. एक वर्षापासून या कामानं थोडं मोठं स्वरुप धारण केलंय. आता रोजच बच्चेकंपनीसाठी क्रेझी फ्रेंडस् ग्रुपकडून या उपक्रमाचं आयोजन केलं जातं.

                   समाजातील रंजलेल्या-गांजलेल्या, अनाथ , गतिमंद-मतीमंद यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी 15 ऑगस्टला क्रेजी फ्रेंड्स ग्रुप ‘रंग दे बसंती’ या  देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये बालांकुरबी , भगवान बाबा बालिकाआश्रम , जिजामाता बालिकाश्रम ,योगेश्वरी बालिकाश्रम,बाबासाई एड्सग्रस्त इत्यादी आश्रम,उत्कर्ष अपंग प्रशिक्षण संस्था,इत्यादी सहभाग नोंदवतात. या कार्यक्रमात देशभक्तीपरगीत ,नृत्य डान्स,पोवाडा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सदरीकरण केले जाते.या करिता मुलांना ट्रेनर उपलब्ध करून दिले जातात.

वेरूळच्या लेण्यांची कथा….

भारताच्या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारणतः 25-30 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत.
देशातील बहुतेक लेण्यांचे खोदकाम पहाडांच्या मध्यभागी झालेले आढळते. मात्र वेरूळचा लेणी समूह सलग प्रस्तरातून निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या लेण्यांचे खोदकाम ‘आधी कळस, मग पाया’ या वचनानुसार पहाडाच्या शिखरापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत येत हे अलौकिक शिल्प साकारण्यातील शिल्पकारांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. लेण्यांचे खोदकाम हाती घेण्याआधी त्या अज्ञात शिल्पकारांनी नियोजित जागेचा निश्चितच अभ्यास करून आराखडा तयार केल्याचे जाणवते.वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.

लेणे क्र.१
हे बुद्धकालीन खोरीव लेणे असून यात ८ खाने आहेत. यामध्ये भिक्खू राहत असत.

लेणे क्र.२
हे लेणे कलात्मक असून यात बुद्ध व तारा बोधिसत्वाच्या आकृत्या रेखाटलेल्या आहेत.

लेणे क्र.३
हे लेणे लेणे क्र.२ प्रमाणे आहे.

लेणे क्र.४
हे लेणे दोनमजली असून यात बुद्ध व बौद्ध विभुतींच्या आकृत्या आहेत.

लेणे क्र.५
हे लेणे महायान व थेरवाद लेणे आहे. याचे क्षेत्रफळ २७ मी. × २८ मी. असून यात बौद्ध भिक्खू शिक्षण कक्ष व भोजन कक्ष म्हणून उपयोग करत होते. यामध्ये बुद्धांची धम्मचक्र मुद्रेतील एक मुर्ती आहे व अवलोकीतेश्वर धोरा धरून झोका देत असल्याचे दिसते.

लेणे क्र.६
हे लेणे विहार आहे. येथे तारा बोधिसत्व, अवलोकीतेश्वर, मंजुर व धन या विभूतींच्या आकृत्या आहेत. तसेच यात हिंदू देवी सरस्वती सुद्धा आहे.

लेणे क्रमांक १० (विश्वकर्मा लेणे)संपादन करा

हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला वरचा मजला असून सज्जा कोरलेला आहे. सज्जाच्या कठड्यावर अनेक लहान शिल्पाकृती कोरलेल्या आहेत.

लेणे क्रमांक ११ (दोन ताल लेणे)संपादन करा

दोन ताल म्हणून ओळखली जाणारी हे लेणे प्रत्यक्षात तीन मजली आहे. लेण्यात वरपर्यंत जाण्यासाठी दगडात घडवलेल्या पायऱ्या आहेत. पहिल्या मजल्यात विशेष दखल घेण्याजोगे शिल्पकाम नाही, मात्र मजल्याच्या मध्यभागी असणाऱ्या गर्भगृहात चौकोनी आसनावर भगवान बुद्धाची पद्मासनात योगमुद्रेत बसलेली प्रतिमा आहे. दुसऱ्या मजल्यावर चार गर्भगृहे आहेत.

लेणे क्रमांक १२ (राजविहार लेणे)संपादन करा

तीन ताल किंवा राजविहार या नावाने प्रसिद्ध असलेली हे लेणे तीन मजली आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंहप्रतिमा आहेत. आत समोरच चौकोनी प्रशस्त प्रांगण आहे. वऱ्हांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे. या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे.

लेणे क्रमांक १६ (कैलास मंदिर)

वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा एका अखंड खडक वापरण्यात आला असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली असणार.कैलास मंदिर लेणे म्हणजे एकसंध खडकातून निर्माण केलेले अवर्णनीय असे नुसतेच काव्य नव्हे, तर ते अजरामर महाकाव्य आहे. २९ मी. उंच ५० मी. लांब आणि ३३ मी. रुंद असे त्याचे आकारमान आहे. शिवाचे निवासस्थान (सदन शिवाचे) म्हणून या लेण्याला कैलास लेणे असे म्हटले जाते. हजारो वर्षांपूर्वी हाती फक्त छिन्नी-हातोडा घेऊन अज्ञात कलाकारांनी हे शिल्प निर्माण करून आमच्या संस्कृतीचा ध्वज जगभर फडकवत ठेवलाय.कैलास लेण्यांच्या प्रवेशद्वारी दोन्ही बाजूंस सुबक शिल्पे आहेत. त्यांना पौराणिक पाश्र्वभूमी आहे. त्यातील शंखनिधी आणि पद्मनिधी हे द्वारपाल आपले लक्ष्य वेधतात. जोडीला महाकाय हत्ती आणि उंच ध्वजस्तंभ, कीर्तिस्तंभांनी या शिल्पाचे सौंदर्य खुलवले आहे. एकाच प्रस्तरातून निर्माण झालेले हे कैलास लेणे इ.स. ८ व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा कृष्णराज याच्या औदार्य, प्रोत्साहनाने निर्माण झाले.

डावरी करे माणसाला बावरी…


 
                  हुंडा घेणे आणि देणे १९६१ पासून कायद्याने गुन्हा असला तरीसुद्धा काही मुलाकडची मंडळी मुलीच्या वडिलांकडून हुंडयाची मागणी करताना माघे पुढे बघत नाही.आणि वेड्या मनाचा मुलीचा बाप विचार करतो कर्जबाजारी झालो तरी चालेल पण आपली मुलगी सुखात राहील, या आशेने लाखो रुपयांच्या मागणीला मुलीच्या वडिलांकडून नकळत होकार दिला जातो.
                  श्रीमंतीचा थाट मिरविण्यासाठी समाजात आजही हुंडा देण्याची व घेण्याची प्रथा चालूच असल्याचे आपल्याला दिसते . माणसाच्या ह्या हावरट स्वभावामुळे तर कधी कधी मुलीच्या पित्याला पैश्याची जुळवाजुळव करताना नकी नऊ येऊन त्याची जीव जायची वेळ आली आहे .पण आपल्या मुली साठी कसे बसे पैसे जमा करून तो लग्न अगदी थाटामाटात लाऊन देतो. पण खऱ्या हुंड्याची मागणी तर लग्नानंतर सुरू होते.  पण समाजाची ही मानसिकता बदलणार कधी बदलणार हे मात्र आपल्याला समजायला मार्ग नाही. लग्न म्हणजे दोन मनांचे, दोन कुटुंबांचे मीलन असताना लग्नसोहळ्याला बाजारेठांमध्ये रूपांतर करून मुला-मुलीचा एकप्रकारे भाव ठरवल्यासारख च वाटत आहे.सोने,चांदी पैसा, गाडी, लग्नाचा थाट, एवढं करून देखील मन भरत नाही.लग्नानंतर पैशांसाठी तर मुलीला मारहाण केली जाते.तिच्याच सासरच्यांकडून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले जातात.पैसे आणले नाही तर तिला अमानुष अशी वागणूक दिली जाते. काही लोक तर मुलाच्या शिक्षण ते नोकरीपर्यंतचा आलेला खर्च मुलीच्या घरच्यांकडून ओरबडायला बघतात. ‘हुंडा’ हा फक्त दोन अक्षरीच शब्द असला तरी मुलीच्या पित्याला कर्जबाजारी करणारा आणि मुलाकडच्या मंडळींना मालेमाल करणारा असा आहे.
                     आपल्याला पण मुलगी आहे याचा जर विचार केला आणि ही हुंड्याची प्रथा परंपरा आपण बंद पाडू शकतो.काही लोकांना तर असे वाटते की आपल्या मुलाला आलेला हुंडा आपण आपल्या मुलीच्या लग्नकार्यात वापरू शकतो पण ते हे विसरून जातात की समोरचा पण एक मुलीचा बाप च आहे. एवढं सगळं करून देखील जर आपली मुलगी सुखात नसली तर काय फायदा एवढं पैसाअडका लाऊन त्याची कवडीमोड किंमत उरत नाही. आपण जर कोणाची मुलगी आपली अर्धांगिनी म्हणून आणली असेल तर तिला आपण तशी वागणूक पण देणे अपेक्षित आहे.ते सोडून तिच्याकडे आपण पैशाची मशीन म्हणून बघायला पण कमी करत नाही.आपण जर एक चांगला पती होऊन तिला पत्नी म्हणून वागवले व तिला समाजात तिची प्रतिष्ठा,हक्क मिळवून दिली तर कोणाची हिम्मत होणार नाही तिच्यावर बोट दाखवून काही बोलण्याची.पण ह्या उलट आपण वागतो तिला काही ठिकाणी अमानुष अशी वागणूक दिली जाते.हे थांबायला हवं आपली मुलगी पण कोणाच्या घरी सून होऊन जाणार आहे हे आपण विसरतो.पण हीच गोष्ट जर आपल्या बहिणीसोबत घडली तर मात्र आपल्याला त्रास होतो म्हणून आपल्याला बहिणीला जी वागणूक आपण देतो त्याच प्रकारे आपली बायको पण कोणाची तरी बहीण आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
                           काही ठिकाणी मात्र एका स्त्री ल अगदी चांगल्या प्रकारे नांदवले जाते.तिला कोणत्या ही प्रकार छा त्रास आपल्या सासरी होत नाही.अशी च जर सगळ्यांनी आपल्या घरच्या लक्ष्मी ची काळजी घेतली तर समाजातील अर्धे गुन्हे घडायचे थांबतील.आणि हळूहळू गुन्हेगारी कमी होत जाईल…….

अमेरिका च्या मेलिंडाचे यश…

मेलिंडा गेट्स, एक अमेरिकन परोपकारी आणि मायक्रोसॉफ्टमधील माजी सरव्यवस्थापक आहेत. २००० मध्ये, तिने जगातील सर्वात मोठी खाजगी सेवा देणारी संस्था पती बिल गेट्स यांच्यासमवेत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची सह-स्थापना केली.गेट्स बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सह-अध्यक्षपदी परपकारात सर्वात शक्तिशाली स्त्री म्हणून तिचे स्थान कायम आहे.जगातील सर्वात मोठा खाजगी चॅरिटेबल फाउंडेशन आहे जो $ 40 अब्ज डॉलर्सचा विश्वास आहे. शिक्षण आणि दारिद्र्यपासून गर्भनिरोधक आणि स्वच्छतेपर्यंतची कठोर जागतिक आव्हाने सोडविण्यात ती पायाभूत रणनीती आखण्यामध्ये अधिकच दृश्यास्पद आहे. सर्व लोकांना निरोगी, उत्पादक जीवन जगण्यासाठी मदत करण्याच्या फाउंडेशनच्या
मोहिमेचा एक भाग म्हणून तिने आपले बरेच काम महिला आणि मुलींच्या हक्कांसाठी वाहिले आहे. . दोन सेवाभावी संस्था गेट्स लायब्ररी फाऊंडेशन आणि गेट्स लर्निंग फाऊंडेशनशी एकत्र केले.  जरी फाऊंडेशनचे प्रारंभिक लक्ष्य संगणक आणि मायक्रोसॉफ्टची उत्पादने संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये ग्रंथालयांमध्ये ठेवण्याचे होते, परंतु वर्षानुवर्षे शिक्षणामध्ये जगभरात होणाऱ्या सुधारणांचा समावेश करण्यासाठी मेलिंडाने संस्थेची दृष्टी वाढविली. मे२००६ मध्ये, स्थानिक आणि जगभरातील मुलांचे जीवन सुधारण्याच्या तिच्या कार्याचा सन्मान म्हणून, सिएटल चिल्ड्रन हॉस्पिटलने सिएटल चिल्ड्रन्स (पूर्वी मुलांचे रुग्णालय आणि प्रादेशिक वैद्यकीय केंद्र) येथे मेलिंडा फ्रेंच गेट्स एम्बुलेटरी केअर इमारत समर्पित केली. 2007 मध्ये, गेट्स यांना स्वीडनच्या स्टॉकहोममधील करोलिन्स्का संस्थेतर्फे औषधात मानद डॉक्टरेट मिळाली. सर्वाधिक पॉवरफुल महिलांच्या यादीमध्ये ती 3 व्या स्थानावर होती. परोपकार आणि आंतरराष्ट्रीय विकासाच्या सेवांसाठी गेट्स यांना 2013 मध्ये ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरचा मानद डॅम कमांडर म्हणून नियुक्त केले गेले.

‘ते’ 377!

समलैंगिकता! काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने पुराणकालीन विचार मांडणाऱ्या या कायद्याला रद्दबातल ठरवलं होतं. हा कायदा निश्चितच राज्यघटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करणारा आहे. केंद्र सरकारने या निर्णयाविरोधात अपील केलेलं नाही. मात्र भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माच्या स्वयंघोषित संरक्षकांनी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दोन न्यायमूर्तींच्या पीठाने यापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द केला. ‘कायदा निर्मितीचा अधिकार संसद आणि विधानसभांना आहे, त्यांनीच हा जुना कायदा बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा’, असं या निर्णयामागील तर्क होता.

समलैंगिकतेसंदर्भातील वादविवादांची लय नेहमीच दांभिकता आणि दुटप्पी मानसिकतेमुळे भरकटते. यावेळीही हाच धोका संभवतो. सगळे धर्म समलैंगिक संबंधांकडे विकृत व्यभिचार किंवा पाप म्हणून पाहतात हे गृहीतकच मुळात चुकीचं आहे. ख्रिश्चन मिशनरी आणि कट्टरपंथी मुसलमान मौलवी यांचा भारतात प्रवेश होण्यापूर्वी हिंदूधर्मीय त्यांच्या कामजीवनाबद्दल बोलताना अवघडून जात नसत.

हे समलैंगिक संबंध पुरातन काळातून चालत आले आहे. याचेच उदाहरण पुढीलप्रमाणे- महादेव अर्थात शंकराचं एक रूप अर्धनारीनटेश्वर आहे. आजच्या काळातील ‘एंड्रोजीनस सेक्श्युअलिटी’चाच हा प्रकार म्हटल्यास वावगं ठरू नये. पौराणिक आख्यायिकांनुसार विष्णूने मोहिनीचं रूप घेणं कोणत्याही भक्ताला अनैसर्गिक किंवा विकृत स्वरूपाच वाटत नाही. याबाबत एक गोष्ट समजून घेणं फार महत्वाचं आहे. दोन प्रौढांमध्ये सहमतीने असणारे समलैंगिक संबंध आणि अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण यात प्रचंड फरक आहे. 377 कलमाची अंमलबजावणी कायम राहावी यासाठी हा युक्तिवाद देता येणार नाही.

समलैंगिकता हा आजार नाही तसंच ही मानसिक विकृतीही नाही, असं एकविसाव्या शतकातील संशोधनानुसार स्पष्ट झालं आहे. त्यामुळे समलैंगिक म्हणजे काहीतरी विचित्र, विकृत असं ठरवलं जाऊ शकत नाही. ज्यांची लैंगिक ओळख समलैंगिक आहे त्यांना त्यापद्धतीने जगण्यापासून वंचित ठेवलं जाऊ शकत नाही.

या विषयावरच एक चित्रपट नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा…’ हे या सोनम कपूर अभिनीत  चित्रपटाचं नाव. त्यामध्ये सोनम कपूर ने एका लेस्बियन स्त्री ची भूमिका अप्रतिमपणे पार पाडली आहे.  त्या चित्रपटात तिला एका मुलीसोबत प्रेम होते. पण ती कधी तिच्या भावना आपल्या कुटुंबियांना सांगण्याचा प्रयत्न करायला धजत नाही. समाजाच्या भीतीने म्हणावं की आपल्या वडलांच्या इज्जतीसाठी, तीने आपल्या भावना कधीच कोणासमोर आणल्या नाही. अशाच हजारो सोनम आपल्या देशात आहेत पण त्या समाजाच्या आणि लोकांच्या भीतीने कधीच समोर येण्याचा प्रयत्न करत नाहीये. तरी चित्रपटात शेवटी सोनम हिम्मत करून आपल्या वडिलांना सगळी हकीकत सांगते. तेव्हा तिला  स्वीकारायला ते नकार देतात. पण नकार देणार तरी किती दिवस ना! कधी न कधी तर आपल्याला ह्या समलैंगिकततेला स्वीकारावं लागणारच आहे. भले ही ते स्वेच्छेने असो की मनाविरुद्ध असो.
समाजाला बदलावं लागणार आहे कारण त्याची सुरुवात झाली आहे. आणि भलेही तुम्ही कितीही नकार द्या पण सत्य बदलत नाही आणि सत्य हे आहे की समलैंगिक आपल्या समाजाचा अतूट भाग आहे. त्याचा स्वीकार करावाच लागणार आहे आणि करावाच. आपण थोड्या समजुदार पणाने त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला अधिकार दिले पाहिजे. ज्याप्रमाणे एका स्त्री-पुरुषाचं नातं  समाजात प्रतिष्टेने मिरवलं जातं, त्याचप्रमाणे एका स्त्री-स्त्री च नातं किंवा पुरुषा-पुरुषा मधील हे नातं सुद्धा समाजात त्याच प्रतिष्टेने मिरवता आले पाहिजे. त्यासाठी त्या लोकांना, त्या 377 ला समजून घेणे गरजेचे आहे. तो आणि ती च्याही पुढे ‘ते’ आहेत आणि त्यांना समजणे गरजेचे आहे. तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने बदलला, उन्नत झाला असे म्हणता येईल!

आजची सक्षमा….

या सृष्टी ची निर्माती तू…
बिजांडी तू , ब्रह्मांडी तू…
गर्भाचा हुंकार आणि अवकाशी ओंकार तू…
आदी नव्हे तू आदिमशक्ती…
या विश्वाची तूच सार्थवाही…
असे सखल स्त्री जातीच्या बाबतीत म्हंटले जाते.’स्त्री’ हा शब्द उच्चरताच अपल्यासमोर उभी राहाते ते एक चाकोरीबद्ध आणि समाजाने निर्माण केलेली एक विशिष्ट अशी प्रतिमा…
परंतु काळ बदलला तशी ही प्रतिमाने ही बदलली…केवळ ‘चूल आणि मूल’या चौकटीतून ती बाहेर पडून पुढे जात आहे. प्रचंड धाडशी,साहसी,सामर्थ्यवान,कर्तृत्र्ववान,ध्येयशाली अशी ही आज ची सक्षमा आहे.आणि तिच्या पुढे आज समाजाला देखील दोन पाऊले माघे यावं लागत आहे.
नुकताच आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित’आनंदी गोपाळ’हा सिनेमा प्रकाशित झाला.या सिनेमामध्ये शिक्षणादरम्यान त्यांना कशा प्रकारच्या अडचणी येतात आणि इचछा शक्तीच्या जोरावर अडचणींवर मात करून भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान आनंदीबाईंनी मिळवला.याद्वारे स्त्रियांमध्ये असलेली क्षमता , चिकाटी,सातत्य दिसून येते.
अंतराळाला गवसणी घालून येणाऱ्या कल्पना चावला,सुनीता विल्यम्स,क्रीडा क्षेत्रातील सायना नेहवाल,पी.व्ही.सिंधू,मेरी कोम, राही सरनोबत,एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे,सामाजिक क्षेत्रातील मेघा पाटकर,सिंधुताई सपकाळ,राजकीय क्षेत्रातील पंकजा मुंडे, प्रतिभाताई पाटील,तसेच पत्रकारिता क्षेत्रातील गौरी लंकेश,नम्रता वागळे, इ. अशा सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत पण हे झालं एक ग्लॅमरस जग..परंतु या पलीकडे जाऊन विचार केला तर एक वेगळीच सक्षामा आपल्यासमोर येईल जिचं नावही कधी आपण ऐकले नसेल आणि तिला कधी बघितले पण नसेल.
पण ती धडपडतेय रोज …त्याच जिद्दी नि आणि परिश्रमाने…
प्रश्न नक्कीच पडला असेल
कोण असेल ही ‘सक्षमा’…?
उत्तर:-आपल्या आजूबाजूलाच वावरती ‘ती’
सर्वप्रथम घरापासून सुरुवात करूयात आपली ‘आई’…दिवसभर घरातील सर्व काम करते कोणाला काय हवं काय नको हे सगळे तिला ठाऊक असते एखाद्या दिवशी ती घरी नसली तर होणारी फजिती सगळ्यांनीच अनुभवली असेलत्यामुळे कौटुंबिक जबाबदारी योग्यरित्या सांभाळणारी ही ‘सक्षमा’..
माझ्या घरासमोर रोज एक ‘आजी’ मोठी टोपली डोक्यावर घेऊन सकाळी सहा वाजता भाजी विकण्यासाठी जातात.साधारणतः 80 वर्ष वय असलेली ही ‘वृद्धा’…सण असो की काहीही पण तिचा नित्यनियम अगदी रोजचा….बघितल्यावर एकच शब्द मनात येतो तो म्हणजे ‘परिस्तिथी’ आणि याच परिस्थितीवर मात करण्यासाठी वयाच्या अवघ्या 80 व्या वर्षीही भाजी विकून पैसे कमावणारी ही ‘सक्षमा’…
नोकरी करत घर सांभाळणारी शेतात उन्हातान्हात राब राब राबणारा किंवा घरात काम करणारी ती मोलकरीण असूया सर्वजणी परिस्थितीला स्वीकारून स्वकर्तुत्वाने पुढे जात आहेही विशेष…कर्तृत्व जी अस्तित्व बदलायलाही भाग पडतात अशी कर्तृत्व पार पडणारी ही आज ची ‘सक्षमा’…

खाकी वर्दीतला पण एक माणूस च आहे हो …..


    
               एकीकडे कोरोना नावाच्या विषाणू नी संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना  देशात सध्यपरिस्थिती  काय चालू आहे काय नाही याचं काही घेणं देणं च नसल्यासारखं लोक निष्काळजीपणाने रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत जशी  त्यांना त्याची काही पर्वाच नाही..त्यांना त्या विषाणू नी काही होणार च नाही..
                समजदारी दाखण्याऐवजी त्यांना उतावळे पणा दाखवायला मजा येते आणि मग पुढे काय ? खातात पोलिसांचे दांडे… संचारबंदी लागू झाली तरी  देखील त्यांच्यात सुधार न होता उलट त्याअधिक लोक रस्त्यावर येऊ लागतात .नाईलाज म्हणून पोलिसांना त्यांच्यावर पोकळ बांबुंचे फटके देण्याशिवाय  पर्यायच  हे लोक ठेवत नाहीत.अश्याच लोकांमुळे पोलिसांना २४ तास ऑन ड्युटी राहावं लागते. कोरोना मुळे लॉक डाऊन होऊन अख्ख जग बंद पडलंय आणि इकडे आमचे महाराष्ट्र पोलीस स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस लोकांच्या आरोग्यासाठी रस्त्यावर फिरत असतात हे देखील आम्हाला कळत नाही हो.. ह्या परिस्थितीत काही लोकांना दोन वेळ च जेवायला सुद्धा मिळत नाही अश्या लोकांना आपले पोलिस बांधव मदत करत आहेत.काही  चांगले काम हे करत असतात तेव्हा नाही आम्हाला पोलिसांचे कौतुक करता येत. पोलिसांकडून एखादी चुकीची गोष्ट मात्र घडली की आम्ही त्यांच्यावर टीका कराला मोकळे..
                 आम्हीच चुकी करून आम्ही च वरतून पोलिसांना शिव्या देतो मारहाण करतो .काही ठिकाणी तर स्वतःच हित देखील लोकांना समजत नाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणयासाठी त्यापासून बचाव व्हावा यासाठी सरकार जीवाचा अकांत करून सर्वांना सांगत आहे की आपापल्या घरात बसा बाहेर जाऊ नका. तरी देखील काही दिडशहाणे घराबाहेर मोकाट फिरताना दिसले म्हणून  त्यांनाच सूचना देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना च मारहाण केल्याचे अनेक प्रकार घडले हे कुठ पर्यंत योग्य आहे ..आपण काय करतोय ते देखील लोकांना समजत नाहीये.ज्या लोकांना खरंच बाहेर जाण्याची गरज आहे तश्या लोकांसाठी हि लोकं अडचणी निर्माण करतात. पण आपण जर स्वतः पुढाकार घेऊन घरात बसलो तर आपले काही बिघडणार तर नाही ना शेवटी पोलिस देखील एक माणूसच आहे हे आपल्याला ठाऊक आहे ना ..त्याला सुद्धा एक छान कुटुंब असेल .आपल्या एका चुकीमुळे काही लोकांना त्याचा त्रास होत आहे हे आपल्याला समजायला हवं..एक पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य म्हणून मला ते कळत आहे जाणवत आहे.सगळे लोक घरात बसून आहेत आणि आपला घरचा माणूस जेव्हा बाहेर जातो न तेव्हा समजते हे संकट किती मोठं आहे ..  आपल्या महाराष्ट्रातील पोलिस बांधवांना एक मदतीचा हात म्हणून आपण घरीच थांबून आपल्या राज्याला देशाला वाचवू या..

#StayHome_StaySafe

भारतीय साहित्यातील एक रत्न : अरुंधती रॉय

केरळमधील मेरी ही ख्रिश्चन महिला १९६०च्या सुमारास कोलकात्यात नोकरी करत होती. त्याच ठिकाणी त्यांची रंजित रॉय या जमीनदार कुटूंबातील व्यक्तीशी भेट झाली. चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक असणारे रंजित रॉय यांच्याशी मेरी यांचे लग्न झाले. ते शिलॉंगमध्ये असताना त्यांना एक मुलगी झाली. त्या मुलीचे नाव सुजाना अरुंधती असे ठेवण्यात आले. अरुंधती दोन वर्षाच्या असतानाच त्यांचे आई वडील विभक्त झाले. त्यानंतर त्यांचे बालपण केरळ मधील अयमानम येथे त्यांच्या आईसोबतच गेले. त्यांच्या आई मेरी यांच्यामुळे त्यावेळी ख्रिश्चन उत्तराधिकारी कायद्यात बदल झाले. त्यांच्या आईने आपल्या भावाविरुद्ध वडिलांच्या संपत्तीसाठी खटला दाखल केला आणि तो जिंकलाही. त्यामुळेच तेव्हापासून ख्रिश्चन वडिलोपार्जित संपत्ती कायद्यात मुलींनाही बरोबरीचा हक्क मिळू लागला. १६व्या वर्षी अरुंधती दिल्लीत स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरमध्ये शिकण्यास गेली. तेथे त्यांची भेट गेरॉर्ड द कुन्हाशी झाली. दोघांनी १९७७मध्ये लग्न केले. पाच वर्षे त्यांनी आईशी संपर्क साधला नाही. आणि त्यानंतर चार वर्षांतच गेरॉर्ड यांच्यापासून त्या विभक्त झाल्या. याच काळात त्यांची भेट प्रदीप कृष्ण या चित्रपट निर्मात्याशी झाली. ते तेव्हा 'मॅसी साहब' हा चित्रपट तयार करत होते. त्यात त्यांनी अरुंधतीलाही भूमिका दिली. त्यानंतर अरुंधती आणि प्रदीप हे विवाहबद्ध झाले. पण त्यानंतर प्रदीपपासूनही त्या विभक्त झाल्या. त्यानंतर त्या जोमाने लेखन करू लागल्या. सुरूवातीच्या काळात अरुंधती रॉय यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी काम केले. इन विच एनी गिव्ह्‌ज इट दोज वन्स (१९८९) या स्वानुभावावर आधारित चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली. इलेक्ट्रिक मून (१९९२) ची पटकथाही त्यांनी लिहिली.१९९७चे वर्ष हे स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्याच काळात अरुंधती रॉय यांच्या 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या पुस्तकाचीही भरपूर चर्चा होत होती. या पुस्तकाला त्या वर्षीचा बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुकर पुरस्कार हा जागतिक साहित्यातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. त्याचबरोबर अरुंधती रॉय या मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. २०१७ या वर्षी प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक 'द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस' हे पुस्तकदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरले होते.

पर्यावरण वाचवण्यासाठी धडपडणारी ग्रेटा थनबर्ग

ग्रेटा दी ‘ ग्रेट ‘

देशभरात अनेक लोक आपापल्या परीने सामाजिक कार्य करत असतात. मात्र, त्यांच्यापैकी काही छोट्या वयातच मोठ्या समस्यांच्या ऊहापोहासाठी कारणीभूत ठरतात. अशाच काहींपैकी एक म्हणजे अवघ्या १७ वर्षाची ग्रेटा एर्मन थनबर्ग.  ग्रेटा जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल थांबवण्यासाठी कार्यरत असणारी स्वीडिश कार्यकर्ती आहे. या विषयाकडे तमाम धोरणकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने ऑगस्ट २०१८ मध्ये स्वीडिश संसदेच्या इमारतीबाहेर आंदोलन पुकारले. तिच्या या एका कृतीने अवघे विश्व ढवळून निघाले.  ‘पृथ्वी व पर्यावरण वाचवा’ असा आर्त टाहो तिने फोडला. त्या क्षणापासून जगभर ज्वाळेसारखी ही चळवळ पसरली. ‘नो वन इज टू स्मॉल टू मेक द डिफरन्स’ हे ग्रेटाच्या भाषणांचे पुस्तक आले असून त्याचे स्वामित्वधन तिने पर्यावरण चळवळीला दिले. अवघ्या 16 वर्षांची स्वीडिश एक्टिविस्ट ग्रेटा थनबर्गला बुधवारी टाइम मॅगझिनतर्फे 2019चं ‘पर्सन ऑफ दी इयर’ म्हणून गौरवण्यात आलं.न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या जोडीने चाललेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत ‘आमच्या अंगावर केवळ पोकळ शब्द फेकून आमचे भवितव्य कुस्करण्याची तुमची हिंमत तरी कशी होते…’ असा खडा सवाल नेत्यांना करणारी सोळा वर्षांची ग्रेटा थनबर्ग ‘राइट लाईव्हलीहूड’ या पर्यायी नोबेल पुरस्काराची विजेती ठरली आहे.

कस्तुरीच्या शोधात….

मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्दर्शक विनोद कांबळे यांच्या कस्तूरी ‘द मस्क’ या चित्रपटातून एक दलित मुलागा  (समर्थ सोनवणे) याच्या आयुष्याची मांडणी अगदी साधी पण थक्क करणारी आहे .सुरुवातीला एका गणवेशातील मुलाने आपली अस्वच्छता स्वच्छ केल्याची प्रतिमा आपल्या मनावर खोलवर परिणाम करते. पहिल्यांदा विनोद कांबळे यांनी तरुण गोपीनाथ चव्हाण यांच्या आयुष्यातील निराशा पहिल्या फ्रेमपासून सामायिक केली आहे. गोपी आपल्या आयुष्याबद्दल आशावादी आहे. त्याला मृतदेहांसाठी कबरे खोदण्यात आणि स्थानिक रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी वडिलांच्या मदतीसाठी अनेकदा शाळा सोडावी लागते.
               शिक्षणाची जिद्द आणि चिकाटी असूनही त्याला परिस्थिती समोर शिक्षणाचा त्याग करावा लागला. गोपीच्या मार्गातील अडथळे असंख्य आहेत. त्याचे वडील अल्कोहोलिक आहेत आणि सतत मद्यपान करत असल्याने  स्थानिक रुग्णालयात नोकरी गमावतात. तेव्हा गोपीला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागते.त्याची इच्छा नसताना देखील तो वडिलांच्या पाऊलावर पाऊल  ठे ऊन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास मदत करतो. त्याच्या आईचा असा विश्वास आहे की गोपीला शाळेत जाण्यापेक्षा कामावर जाणे जास्त महत्वाचे आहे. आपल्या मुलाला ती म्हणते: “चांगले गुण तुला खायला घालणार नाहीत, कामाला लागलास तर तुझाही आपल्या कुटुंबाला तेवढा हातभार लागेल. असे सांगत त्याची आई त्याला कामावर जायला सांगते.
त्याने घेतलेल्या कामांमुळे गोपी आपल्या स्वच्छतेबद्दल आणि छान वास घेण्याविषयी कठोर आहे. त्याचा जिवलग मित्र आदिम (श्रावण उपलाकर) त्याला त्याच्या काकांच्या अत्तर च्या दुकानामध्ये बनवलेले नवनवीन सुगंध मिळवून देतो.पण कस्तुरी सारख्या वासातून गोरक्षनाथांविषयीची धार्मिक कथा ऐकल्यानंतर, आपण ते आत्मसात केले पाहिजे असे त्याला वाटते.गोपी एक चांगला विद्यार्थी आहे प्रजासत्ताक दिनी गोपीला संस्कृतमध्ये निबंध लिहिण्यासाठी बक्षीस देण्यात येत आहे त्यादिवशी आपला असाच दुर्गंध येऊ नाही म्हणून तो कस्तुरीचा सुगंधाच्या शोधाला लागतो.तेव्हा त्याला कळते की  गावातील एका व्यक्तीकडे कस्तूरी आहे तेव्हा ते यांच्याकडे जातात आणि तो कस्तुरी घेण्यासाठी 3,००० रुपये त्याला देतो पण त्याची फसवणूक करून त्याला खोटी कस्तूरी देण्यात येते.
त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे तो परत आपल्या कामावर जातो.तिथून शाळेत जाण्याअगोदर च शवविच्छेदन करण्यासाठी एक मृतदेह रुग्णालयात येतो अने त्याचे बक्षीस घेण्याचं स्वप्न ते स्वप्न च राहून जाते.कांबळेचा हा चित्रपट त्यांच्या स्वत: च्या आयुष्यातील घटनांनी प्रेरित आहे; चित्रपट निर्माता स्वतः सफाई कामगारचा मुलगा आहे. गोपीच्या नजरेतून सर्वांना जग दाखवून, कांबळे आपल्यासाठी आधीपासूनच लिहिलेले भविष्य भविष्याविरूद्ध जोरदारपणे संघर्ष करण्यासाठी उज्ज्वल मुलाची लढाई करण्यासाठी आपल्याला जागरूक करते.